*कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!रोहन परिचारकांकडून कौतुक
कर्मयोगी विद्यानिकेतनचा विद्यार्थी नवोदयसाठी पात्र
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

पियुषने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले. या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांनी त्याचे कौतुक केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पियुषचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पियुषच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

