*नगरपालिकेत सत्तेनंतर भालके गटाची नवी चाल –भालके गटाच्या "त्या"पदासाठी सुधीर धोत्रे चर्चेत!*
भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीर धोत्रे यांची लागणार प्रवक्तेपदी वर्णी? विरोधकांना बसणार झटका!
पंढरपूर; प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भालके गटाने आपली ताकद दाखवून देत पंढरपूर नगरपालिकेत सत्ता मिळवली. या विजयामध्ये अनेक निष्ठावंत शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या तालमीत तयार झालेले आणि भालके गटाचे दबंग नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी विरोधी पक्षनेते **सुधीर धोत्रे** यांचे नाव या निष्ठावंत शिलेदारांमध्ये अग्रस्थानी घेतले जाते.
स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या निधनानंतर भालके गट विखुरला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अनेक मोठ्या पदांचे तसेच धनलक्ष्मीच्या आमिषाचे प्रस्ताव येऊनही सुधीर धोत्रे यांनी भालके गटाशी निष्ठा कायम ठेवली. नगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भालके गटाचा गड मजबूत ठेवला.

धोत्रे यांनी केवळ आपल्या प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे ते नागरिकांमध्ये सक्रिय आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, पंढरपूर नगरपालिकेत भालके गटाची सत्ता आल्यानंतर विरोधी गटातील काही जणांकडून सत्ताधारी भालके गटावर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भालके गटाकडून अधिकृत प्रवक्त्याची नियुक्ती व्हावी, अशी चर्चा शहरात आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
या संभाव्य प्रवक्तेपदासाठी भालके गटाचे निष्ठावंत शिलेदार आणि माजी विरोधी पक्षनेते **सुधीर धोत्रे** यांचे नाव आघाडीवर घेतले जात असून, त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
—
