पंढरपूर पंचायत समितीवर पुन्हा ‘परिचारक’चा झेंडा; राजकारणात नाट्यमय घडामोडी, वसंत नाना देशमुखांकडून पंतनिष्ठा कायम
पंढरपूर; प्रतिनिधी
पंढरपूर पंचायत समितीवर पुन्हा ‘परिचारक’चा झेंडा; राजकारणात नाट्यमय घडामोडी, वसंत नाना देशमुखांकडून पंतनिष्ठा कायम
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पंढरपूर पंचायत समितीवर सत्ता कोणाची येणार याकडे संपूर्ण शहर व तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र या सत्तासमीकरणात सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार *प्रशांत परिचारक* यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवत पंचायत समितीवरील सत्ता अबाधित ठेवली आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सत्ताधारी परिचारक गट आणि विरोधी गट यांच्यामध्ये जागांची संख्या जवळपास समसमान झाल्यामुळे पंचायत समितीवर अंतिम वर्चस्व कोणाचे राहणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

अशातच **वसंत नाना देशमुख** (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष) यांनी स्वर्गीय **सुधाकर पंत परिचारक** यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत ‘पांडुरंग परिवार’ म्हणजेच परिचारक गटाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचे पारडे पुन्हा एकदा परिचारक गटाच्या बाजूने झुकले.
याच पार्श्वभूमीवर चर्मकार समाजाचे युवा व तडफदार नेतृत्व **Dr. शुभम सुरेश आगावणे * यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे माजी आमदार **प्रशांत परिचारक** आणि पंढरपूर शहर-तालुक्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे **उमेश परिचारक* यांनी पंचायत समितीचा गड पुन्हा कायम राखत राजकीय पटावर निर्णायक चाल खेळल्याची चर्चा रंगली आहे.
—
